तांदूळ माफियांना आवर कोण घालणार?, रेशनचा माल राईस मिलमध्ये, तिथून पुढे!वाचा सविस्तर... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

तांदूळ माफियांना आवर कोण घालणार?, रेशनचा माल राईस मिलमध्ये, तिथून पुढे!वाचा सविस्तर...

दि. २२.०५.२०२३

Vidarbha News India

तांदूळ माफियांना आवर कोण घालणार?, रेशनचा माल राईस मिलमध्ये, तिथून पुढे!वाचा सविस्तर...

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली/सिरोंचा : सिरोंचा शहराबाहेर एका राईस मील परिसरात केव्हाही फेरफटका मारल्यास हा प्रकार सहज दिसून येईल. मोठ्या प्रमाणावर तांदळाची चिल्लर खरेदी करून ट्रकमध्ये भरला जातो. त्यानंतर जिल्ह्यातील वितरकांना अवैधरित्या पुरवठा करण्यात येतो.

तेलंगणा राज्यातून तांदूळ येत असल्याची माहिती आहे. तेलंगणामध्ये अतिशय कमी दरात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मिळत असते. तेच तांदूळ चिल्लर स्वरूपात विकले जातात. हा तांदूळ खरेदी करून गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पोहचविला जातो.

तांदळाची अवैध विक्री

या तांदळाची अवैध मार्गाने विक्री होत आहे. असे असतानाही पुरवठा विभाग तसेच पोलीस विभाग सुध्दा चिरीमिरी घेऊन मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याची माहिती काही गोपनीय सूत्रांनी दिली. अशाप्रकारे तांदळाची अवैध विक्री गडचिरोली प्रशासनाच्या अप्रत्यक्ष मदतीने होत आहे.

माहिती तपासून पाहण्यासाठी काही पत्रकारांची टीम या गोडाऊनवर दाखल झाली होती. या ठिकाणी पाहणी केली असता पाच ते सात ट्रक या ठिकाणी तांदूळ भरून नेण्यासाठी आले असल्याचे दिसले. त्यापैकी एका ट्रकमध्ये मजुरांद्वारे तांदळाचे काही कट्टे भरीत असल्याचे दिसून आले होते.

तक्रार करूनही कारवाई नाही

याबद्दल त्या ठिकाणी उभे असलेल्या चार पाच लोकांना विचारले असता, त्या लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पत्रकारांनी ताबडतोब जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार सिरोंचा यांना मोबाईलवर माहिती दिली. परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. सदर तांदळाच्या अवैध विक्री कामात शासकीय अधिकाऱ्यांची खुलेआम मदत होत असल्याचे आढळून आले आहे.

तांदूळ माफियांवर कारवाई केव्हा ?

या तांदळाची अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव वितरण सेठ उर्फ तांदूळ माफिया आहे. मागील दोन-तीन वर्षापासून कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे प्रशासनाच्या अप्रत्यक्ष मदतीने हा कारभार तो करीत आहे. या अवैध कामात पुरवठा विभाग, पोलीस विभाग, तालुक्यातील राजकारणी नेत्यांची संशयित भूमिका असल्याची आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर काही लोकांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

Share News

copylock

Post Top Ad

-->