दि. २७.०६.२०२३
Vidarbha News IndiaACB Trap News | भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास 7 हजाराच्या लाच प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून अटक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : - ACB Trap News | भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास 7 हजार रूपयाच्या लाच मागणी प्रकरणी अॅन्टी करप्शनने अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द गडचिरोली (Gadchiroli ACB Trap Case) जिल्हयातील आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये (Armori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुशाल मुखरूजी राखडे (39, पद - भूकरमापक (अभिलेखापाल), उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, आरमोरी, जि. गडचिरोली) असे लाचेची मागणी करणार्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या पोट हिस्स्याची मोजणी करून शेती जमिनीतील 1 हेक्टर जमीन मॅचअप करून क शीट तयार करून देण्याचे कामाकरिता दि. 23/06/2023 रोजी 7,000/- रु. पंचसाक्षदारासमक्ष सुस्पष्ट मागणी करून लाच (Gadchiroli Bribe Case) रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी जि. गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (Nagpur SP Rahul Maknikar),
अप्पर पोलिस अधीक्षक महेश चाटे (Addl SP Mahesh Chate),
पोलिस उप अधीक्षक अनिल लोखंडे (DySP Anil Lokhande)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले (PI Shreedhar Bhosale),
पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड (PI Shivaji Rathod), पोलिस हवालदार धोटे, पदमगीरवार,
संदीप घोरमोडे, संदीप उडान, पोलिस हवालदार चालक अनिल आंगडवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (ACB Trap News)