दि. २७.०६.२०२३
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विदर्भ स्तरिय पदाधिकारी मेळावा संपन्न...
विदर्भ न्यूज इंडिया
अमरावती : २ जुलै २०२३ रोजी अहमदनगर येथे होऊ घातलेल्या राज्य महामंडळ सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विदर्भ स्तरिय पदाधिकारी मेळावा २५ जुन २०२३ रोजी अमरावती येथे उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची विदर्भ विभागीय महामंडळ सभा अमरावती येथे राज्य संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २५/०६/२०२३ ला संपन्न झाली. 2 जुलै 2023 रोजी अहमदनगर येथे शिक्षक संघाचा राज्य मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार.
आहेत. या मेळाव्यात शिक्षकांच्या जुनी पेन्शनचा विषय तसेच शिक्षक पदोन्नतीचा विषय प्रामुख्याने मांडण्यात येणार असून इतर अनेक प्रश्न या बैठकीत मांडल्या जाणार आहेत तसेच सरकारी शिक्षणावर येत असलेल्या गंडांतराबद्दल भूमिका घेण्यात येईल.
या बैठकीत राज्याध्यक्ष केशवराव जाधव, राज्यसंघाचे जेष्ठ सल्लागार दि.रा.भालतडक , राज्य सल्लागार तथा विदर्भ विभागीय अध्यक्ष विजय बाहाकर अकोला, राज्य संघाचे उपाध्यक्ष अनंतराव चौधरी यवतमाळ,
गडचिरोली जिल्हा संघाच्या कार्याध्यक्षा सौ. शीलाताई सोमनकर, पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी बापू खरात यांनी विदर्भातील संघटना पदाधिकाऱ्यांना 2 जुलै 2023 च्या महामंडळ सभेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विदर्भातील जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील बुलढाणा, सुरेंद्र मेटे अमरावती, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, डी.टी. कावळे गोंदिया, उमाकांत अंजनकर नागपूर, मनोहर शेळके अकोला, गोविंद जाधव यवतमाळ, माधव कव्हर वाशिम, अकोला नगरपरिषद संघाचे अध्यक्ष रवींद्र वानखडे, अमरावती महानगरपालिका अध्यक्ष राजेष पुसतकर, यवतमाळचे कार्याध्यक्ष भारत खडके यांची समायोचीत भाषणे झाली. सभेपूर्वी अमरावती जिल्हा संघाच्या वतीने विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांच्या भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था शिस्तबद्ध रीतीने करण्यात आली.
अमरावती जिल्हा संघाच्या वतीने सभेसाठी उपस्थित राज्यसंघाचे ज्येष्ठ सल्लागार, राज्याध्यक्ष, राज्य संघाचे पदाधिकारी, जिल्हा संघाचे अध्यक्ष व उपस्थित संघटना पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विदर्भ विभागीय महामंडळ सभेस विदर्भातील 11 जिल्ह्यातील संघटना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बहुसंख्येने होती.
बैठकीचे प्रास्ताविक अमरावती जिल्हा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र मेटे यांनी केले तर यशस्वी सूत्रसंचालन अमरावती जिल्हा संघाचे सरचिटणीस राजकुमार खर्चान यांनी केले. तर आभार राज्यसंघाचे प्रतिनिधी आशिष भुयार यांनी मानले.विदर्भ विभागीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्हा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र मेटे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार खर्चान, संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते डी.यु.गावंडे, राज्य संघ प्रतिनिधी आशिष भुयार, कार्यकर्ते सुरेंद्र पाथरे,अधिर कडू,मनोज खोडके,सचिन वावरकर, शिरीष माथूरकर,पंकज देशमुख,दिनेश बारबुद्धे, रविंद्र दिवान,राजु भारसाखडे,सुरेश गावनेर, सिमा पाटील, वंदना सातपुते, संजय भटांचे, प्रशांत निनावी, सुशिल देशमुख यांनी परिश्रम घेतले. या महामंडळ सभेच्या बैठकीत वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संघटनेमध्ये प्रवेश घेतला. राज्याध्यक्ष केशवराव जाधव, जेष्ठ सल्लागार दि.रा.भालतडक व राज्य सल्लागार तथा विदर्भ विभागाचे अध्यक्ष विजय बाहाकर यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.