दि. २६.०६.२०२३
तालुका कृषी विभागात 25 जुन ते 1 जुलै कृषी संजीवनी सप्ताह, विविध कार्यक्रमांचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर/पोभुर्णा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 25 जुनं ते 1जुलै 2023या कालावधीत राज्यात कृषी संजीवनी सप्ताहात प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यावर शेतकरयांमधये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता 1जुलै 2023रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच कृषी दिनी होणार आहे या दृष्टीने पोभुर्णा तालुका कृषी विभागातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे 25जुन रोजी कृषी तंत्रज्ञान प्रसार दिन म्हणून पाळला जाईल 26जुन पोषटीक आहार प्रसार दिन 27 जुनं कृषी महिला शेतकरी सन्मान दिनांक 28 जुन जमिन सुपीकता जागृती दिन 29जुनला कृषी क्षेत्रातील भावी दिशा 30 जुन कृषी प्रक्रीया तंत्रज्ञान प्रसार दिन तर 1 जुलै रोजी कृषी दिन असे तालुक्यातील ग्रामीण स्तर मंडळ स्तर तालुका स्तरावर सप्ताहातील विविध कार्यक्रमांचे नियोजन आहे त्यामध्ये विविध विषयांचे तज्ञ कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमा मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच प्रगतशिल शेतकरी पिकसपरधा विजेते शेतकरी कृषी क्षेत्रातील निगडित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी यशोदित सन्मान देखील करण्यात येणार आहे करीता कृषी संजीवनी सप्ताहातील नियोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन पोभुर्णा तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले आहे.