दि. १५.०६.२०२३
अनधिकृत एच टिबिटी बियाणे खरेदी करु नका, तालुका कृषी विभागाचे आव्हान..!
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर/पोभुर्णा : बाजारात बोगस कंपन्या खाजगी व्यक्ती मार्फत परवाना नसलेल्या अनधिकृत एच टिबिटी कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे या अवैध बियाण्याना शासनाची मान्यता नाही. अशाप्रकारचे बियाणे विक्री करणे किंवा बाळगने, साठा करणे गुन्हा आहे त्यामुळे शेतकऱ्यांने खरीप हंगामात लागवडीसाठी अनधिकृत एचटिबिटी बियाणे खरेदी करु नये असे आवाहन पोभुर्णा तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले आहे. याप्रकारची बियाण्याची लागवड केलेल्या कापुस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले असून एच टिबिटी बियाणे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटिबिटी बियाणे आढळल्यास पोलीसात गुन्हा दाखल होऊ शकतो, याबाबत कृषी व पोलीस विभाग सतर्क असुन एचटिबिटी बियाणे विक्री करणार्या वर लक्ष ठेवून असल्याने कोणी सदर बियाणे विक्रीचा प्रयत्न करू नये. याप्रकारची अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या खाजगी एंजट खाजगी व्यक्ती प्रलोभने दाखवली तरी त्याला बळी पडू नये ही आपली फसवणूक होऊ शकते या संदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे.