दि. १४.०६.२०२३
चामोर्शी येथील बस स्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
- चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करा-; आमदार डॉक्टर देवरावजी होळी
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी , खासदार अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : वासियांची बस स्थानकाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली. चामोर्शी येथे प्रवाशांकरीता लवकरच भव्य असे बसस्थानक उभे राहणार असून या चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी केली.
मागील २ वेळा नियोजित ऑनलाइन भूमिपूजनाचा सोहळा रद्द झालेला असताना अखेर या बस स्थानकाच्या भूमिपूजनाला मुहूर्त प्राप्त झाला. आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते तर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, खासदार अशोकजी नेते, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बस स्थानकाच्या भूमिपूजनाचा ऑनलाईन सोहळा संपन्न झाला.
या भूमिपूजनाच्या प्रसंगी, खासदार अशोकजी नेते आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेसह माजी जिल्हा परिषद सभापती तथा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे , चामोर्शीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई वायलवार, आ.आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, प्रतीक राठी यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित होते.
यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारांना बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उपस्थित कंत्राटदार व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.