दि. १०.०६.२०२३
Vidarbha News India
अभिनयातून गडचिरोलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्याची संधी...
National Level
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्हा असून या भागातून मुंबईसारख्या महानगरीत कलाकार म्हणून पुढे येण्याची संधी फारच कमी आहे.
मात्र, चित्रपट कलाकार, निर्माती व दिग्दर्शिका तृप्ती भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला ती संधी मिळून आली आहे. त्यामुळे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव अभिनयात राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी चित्रपट कलाकार तृप्ती भोईर यांच्या कलाकार निवड चाचणी (ऑडिशन) कार्यक्रमाला भेट दिली असता उपस्थित नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी चित्रपट कलाकार तृप्ती भोईर यांच्यासह वाईस डायरेक्टर विशाल कपूर, दिग्दर्शक तुषार पाखरे, सहाय्यक पुरुषोत्तम रामटेके यांची टीम व जिल्ह्यातून ऑडिशन देण्यासाठी आलेले कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट कलाकार तृप्ती भोईर या मागील 4-5 दिवसांपासुन गडचिरोली येथे असून गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी समाज जीवनावर चित्रपट बनविण्याचा त्यांचा मानस आहे. याकरिता त्या या भागातील दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन तिथे राहून वास्तविक परिस्थिती जाणून घेत आहेत. जिल्ह्यात चित्रपट बनविण्याचा त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले. (National Level)