दि. २४.११.२०२२
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक प्रविण मुंजमकार यांनी कोरोना काळात केला डिजिटल अभिनव नवोपक्रम
Vidarbha News India
Gadchiroli:- विदर्भ न्यूज इंडिया :
गडचिरोली : मागील दोन वर्ष हेे covid 19 आजाराने सर्वांना अतिशय अडचणीचे गेले. या दोन वर्षात विविध गोष्टी सह शाळा सुद्धा बंद होत्या. मग सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो विद्यार्थी शिक्षणाचा? ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक श्री प्रविण यादव मूंजमकर यांना स्वस्थ बसू देत नव्हती. विद्यार्थ्यासाठी सतत काहीतरी करावं असे त्यांना वाटे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोळढा, पंचायत समिती देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे ते कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी तुटू नये म्हणून त्यांनी मनोरंजनातून शिक्षणाची प्रेरणा मिळावी या करिता आपल्या गडचिरोली या आदिवासी बहुल अविकसित आणि मागासलेल्या जिल्ह्यातील भौतिक , एतीहासिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याचे व्हिडिओ च्या माध्यमातून चित्रीकरण करून आपल्या PravinYadav vlogs आणि PRAVIN YADAV या यूट्यूब चॅनल चे माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना व्हॉट्सअँप, फेसबुक वर लिंक शेअर करून सतत गडचिरोली जिल्ह्यातील आणि परिसरातील विविध माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत राहिले. त्यांनतर त्यांनी प्रेरणादायी लघुकाथंची एक मालिका तयार करून विद्यार्थ्यांना पोहचविले. शाळेत ऑनलाईन तसेच जसे शक्य होईल तसे ऑफलाईन विद्यार्थ्याच्या अभिनय, नाट्य, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेऊन तसेच ऑनलाईन गृह कार्य करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. कोरोणा काळात हे कार्य त्यांचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले तसेच त्यांच्या या उपक्रमाचा लाभ महाराष्ट्रातील 9लाखापेक्षा जास्त विद्यार्थी व पालकांनी घेतला . त्यांचे यूट्यूब वर 35 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक रोज व्हिडिओज बघून शिक्षित व प्रेरणादायी होतात. ही आपल्या सर्वांसाठी खुप महत्वाची बाब आहे. त्यांच्या या डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्याना इतिहास, भूगोल, कला, भाषा, अशा विषयात आवड निर्माण होत आहे. येणाऱ्या दिवसात गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कुमार आशीर्वाद सर यांच्या कल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या फुलोरा या उपक्रमातील व्हिडिओ ची मालिका तयार करण्याचा मानस आहे. या सर्व कार्यात पेशाने शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी सौ. अर्चना सांगोलकर जिल्हा परिषद केंद्र शाळा उमानुर या मदत करतात. आता शाळा सुरू झाल्याने दोघांतील शाळांचे अंतर बघता व्हिडिओज ची निर्मिती ची गती सध्या मंदावली आहे. परंतु जर जशी वेळ मिळेल तसे कार्य सुरू राहील असे त्यांचे मत आहे. त्यांच्या अशा डिजिटल अभिनव उपक्रमास विदर्भ न्यूज इंडिया तर्फे हार्दिक शुभेच्छा.
YouTube channel Link:- https://youtube.com/c/PRAVINYADAV
https://youtube.com/c/PravinYadavVlogs