दि. ०९.०६.२०२३
व्यापारी वर्ग आजच्या व्यापारी संमेलनात सहभागी व्हा..; आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन...
- आपल्या अडचणी मोदी सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापारी संमेलनात या...
- केंद्रीय मंत्री अरविंद सिंहजी भदोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सायंकाळी ६:३० वा. हॉटेल लँडमार्क येथे व्यापारी संमेलनाचे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्री मंडळातील त्यांचे सहकारी, सहकारीता सेवा प्रबंधन विभागाचे केंद्रीय मंत्री अरविंद सिंहजी भदोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडचिरोली येथे व्यापारी संमेलनाचे आज सायंकाळी ६:३० वाजता हॉटेल लँडमार्क येथे आयोजन करण्यात आले असून या व्यापारी संमेलनामध्ये व्यापारी वर्गाने सहभागी होऊन केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत आपल्या समस्या मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी विधानसभा क्षेत्रातील व्यापारी वर्गाला केले आहे.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या व्यापारी संमेलनाच्या निमित्ताने चामोर्शी , येथील व्यापारी तपण दोषी, किशोर दोषी, इलेश गांधी , मनेश गांधी, सुनील बालपांडे, गजानन भांडेकर, सुमित मुजुमदार,राजेंद्र भांडेकर, मनीष आंबटकर , सुरेश गोयल ,अमित यासलवार, नंदलाल राठी, इत्यादी व्यापारी बंधूंची भेट घेतली.
चामोर्शी येथील व्यापारी पंकज कागदेलवार, सुनील जुआरे, विनोद खोबे, रमेश चकोर, नागेश चलकलवार व्यापारी वर्गाची भेट घेऊन त्यांना व्यापारी संमेलनात सहभागी व्हावे याकरिता निमंत्रण दिले.