Cyclone Biparjoy : चक्रीवादळ धडकल्यानंतर कशी आहे गुजरातमधील परिस्थिती, फोटोंमधून पाहा वास्तव..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ धडकल्यानंतर कशी आहे गुजरातमधील परिस्थिती, फोटोंमधून पाहा वास्तव..!

दि. १६.०६.२०२३

Vidarbha News India

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ धडकल्यानंतर कशी आहे गुजरातमधील परिस्थिती, फोटोंमधून पाहा वास्तव..!

विदर्भ न्यूज इंडिया

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छमधील जखाऊ किनारपट्टीवर धडकलं आहे.

चक्रीवादळ धडकल्याने गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

चक्रीवादळामुळ जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. हजारो लोकांचा मदत छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.

कच्छमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरु आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी भरलं आहे.

किनारपट्टी भागातील हजारो लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे कच्च्या आणि पक्क्या घरांचं नुकसान झालं आहे. कच्च्या घरांचं छप्पर उडून गेलं आहे. ठिकठिकाणी झालं उन्मळून पडली आहे. वीजेचे खांबही पडले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बाधित भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.

हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. पुढील सूचनेपर्यंत सर्व बोटी बंदरात उभ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बाधित भागातील लोकांचं बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहे.

बिपरजॉय गुजरातमध्ये धडकल्यानंतर अधूनमधून पाऊस पडत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकल्यानंतर आता हे चक्रीवादळ राजस्थानकडे सरकत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->