दि.२४.०६.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : अतिक्रमणधारकांचा रात्रभर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शहरातील गोकुळनगरातील देवापूर रिठ तलावातील अतिक्रमण प्रकरण अधिकच गंभीर वळण घेत आहे. municipality नगरपालिका प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्तात येथील झोपडपट्यांवर बुलडोझर चालविल्याने डोक्यावरचे छत गेलेल्या अतिक्रमणधारकांनी प्रशासन विरोधात रौद्र रुप धारण करीत रात्री संपूर्ण कुटूंबियांसह नगरपरिषदेत ठिय्या दिला.
संपूर्ण रात्र अतिक्रमणधारकांनी येथेच काढित जोपर्यंत प्रशासन स्तरावरुन पर्यायी व्यवस्था करुन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार अतिक्रमणधारकांनी दिला आहे.
गोकुळनगरातील देवापूर रिठ येथील एकतानगर येथील अतिक्रमण municipality नप प्रशासनाने यापूर्वी हटविले होते. मात्र, पुन्हा येथे अतिक्रमणधारकांनी शंभरावर झोपड्या बांधल्या. पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आव्हान दिले, सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. काल गुरुवारी पालिका प्रशासनाने पुन्हा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी उभारलेल्या झोपड्या पाडण्यात आल्या तर संसारोपयोगी साहित्य जमा करण्यात आले. तसेच अतिक्रमणधारकांना ताब्यात घेत पोलिस मुख्यालयात उशिरापर्यंत ठेवण्यात आले होते. डोक्यावरील छत गेल्याने तसेच संसारापयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाल्याने अतिक्रमणधारकांनी रुद्ररुप धारण करित रात्री 8 वाजेपासून अतिक्रमणधारकांनी नगरपालिका कार्यालयासमोर महिला, मुलांबाळांसह ठिय्या दिला. मात्र, रात्रो उशिरापर्यंत प्रशासनाच्या वतीने कुणीही अतिक्रमणधारकांशी संवाद साधला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाद्वारे पर्यायी व्यवस्था जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत सदर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.
सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी municipality नगरपालिका प्रशासनाने तब्बल तीनदा मोहिम राबविली. मात्र, सातत्याने अतिक्रमणधारंकाडून पुन्हा अतिक्रमण करुन झोपड्या बांधल्या जात आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी प्रशासन व अतिक्रमणधारक समोरासमोर आले असून अतिक्रमणधारकही मागे हटण्यास राजी नसल्याने सदर प्रकरण अधिकच चिघळण्याची चिन्हे बळावली आहेत.
लढा अधिक तीव्र करणार
अतिकमणधारकांनी municipality पालिका मुख्याधिकार्यांविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेतून पालिका प्रशासनाने अन्नधान्य, कपडे, भांड्याची नासधूस केली. ही अमानवीय कृती असून याविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभूर्णे यांनी दिला आहे.