गडचिरोली शहरालगत आकार घेत आहे 'व्याघ्र' पर्यटन केंद्र, 'गुरवळा नेचर सफारी' जंगल परिसरात वाघांचा वावर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली शहरालगत आकार घेत आहे 'व्याघ्र' पर्यटन केंद्र, 'गुरवळा नेचर सफारी' जंगल परिसरात वाघांचा वावर

दि. २५.०६.२०२३ 

Vidarbha News India 

गडचिरोली शहरालगत आकार घेत आहे 'व्याघ्र' पर्यटन केंद्र, 'गुरवळा नेचर सफारी' जंगल परिसरात वाघांचा वावर

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : मागील पाच वर्षांत चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी मधल्या काळात वाघांचे हल्लेदेखील वाढले होते. परंतु आता हेच वाघ वन विभागाने निर्माण केलेल्या 'गुरवळा नेचर सफारी'मध्ये दिसू लागल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

त्यामुळे ताडोबानंतर गडचिरोली शहरालगत नवा व्याघ्र प्रकल्प निर्माण होण्याच्या प्रक्रियेत आहे.

१० डिसेंबर २०२१ रोजी गडचिरोली शहरालगत गुरवळा गावानजीक ३७३२.५३ जंगल परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सोयी निर्माण करून ‘गुरवळा जंगल सफारी’ची सुरुवात करण्यात आली. यात ६० किमीचे कच्चे रस्ते तयार करण्यात आले. युवकांना प्रशिक्षण देऊन वाहने उपलब्ध करून दिली. सुरवातीला पर्यटकांना केवळ हरीण, बिबट्या, नीलगाय आदी प्राण्यांचे दर्शन व्हायचे. मात्र, त्यांनतर वाघाचे अस्तित्व वाढू लागले. अनेक पर्यटकांनी सफारीत वाघ दिसून आल्याने ही बाब जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरली. समाजमाध्यमावर वघांचे छायाचित्र सार्वत्रिक होऊ लागले. त्यामुळे सुरवातीला कमी असलेली पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे. सद्यस्थितीत गुरवळा जंगल परिसरात ५-६ वाघ असल्याची माहिती आहे. त्यात चार बछड्यासह फिरणारी वाघीण पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो आहे. चालू वर्षात व्यवस्थापन समितीला यातून जवळपास चार लाखांचा महसूल मिळाला आहे.

 उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके यांच्या विशेष देखरेखीत हे केंद्र सुरू आहे. भविष्यात या पर्यटन स्थळाला अधिक मोठे स्वरूप देण्यासाठी चारही बाजूने मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्यास ताडोबासारखे व्याघ्र प्रकल्पदेखील या ठिकाणी सुरू होऊ शकते. मोठ्या प्रमाणत जंगल असूनही इतक्या वर्षात नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात ‘जंगल सफारी’ सारखे पर्यटन क्षेत्र फुलू शकले नाही. त्यामुळे ‘गुरवळा नेचर सफारी’ने ती सुरुवात केली आहे. राज्य शासनाने मनात आणल्यास या ठिकाणीदेखील एक मोठे ‘व्याघ्र पर्यटन केंद्र सुरू होऊ शकते. यातून गडचिरोलीची वेगळी ओळख निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गुरवळा जंगल परिसरात वैविध्यपूर्ण वनसंपदा, वन्यजीव आढळतात. हा परिसरदेखील विस्तीर्ण आहे. त्यामुळे आम्ही येथे ‘नेचर सफारी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. आतातर पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे. या केंद्राचे व्यवस्थापन वनसमितीकडे दिले आहे. यातून रोजगारदेखील मिळतो आहे. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास हे केंद्र मोठे स्वरूप घेऊ शकते. 

– मीलिश शर्मा, उपवनसंरक्षक, गडचिरोली

Share News

copylock

Post Top Ad

-->