दि. २९.०६.२०२३
Vidarbha News India
Gadchiroli News: गडचिरोली पुरवठा विभागाकडून दोन हजार शिधापत्रिका रद्द
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पुरवठा विभागाने शिधापत्रिकांची तपासणी (Gadchiroli) सुरू केली आहे. यात तब्बल २ हजार १०७ शिधापत्रिका रद्द ठरवले आहेत. यात बनावट (Ration Card) रेशनकार्ड धारकांची संख्या अधिक आहे.
केंद्र शासनाने वन नेशन, वन रेशन कार्ड ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशात कुठेही वास्तव्याला असले तरी संबंधित रेशन कार्डधारकाला धान्याचा लाभ मिळतो. मात्र काही रेशन कार्डधारक स्थलांतरित झाल्यानंतर डुप्लिकेट रेशन कार्ड बनवतात. अशा रेशन कार्डची गडचिरोली जिल्हा पुरवठा विभागाने छाननी करून रेशन कार्ड रद्द केले.
गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे १ लाख १५७ तर प्राधान्य कुटुंब १ लाख १५ हजार २७ शिधापत्रिका आहेत. या सर्वांना धान्याचा लाभ दिला जातो. मात्र काही नागरिकांनी दोन राज्यात रेशन कार्ड तयार केले होते. ही बाब ऑनलाईन प्रोसेसमुळे उघडकीस आल्याने त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.