दि. २९.०६.२०२३
Vidarbha News India
रेल्वेच्या प्रवाशांना 20 रुपयात जेवण तर 3 रुपयांत पाणी मिळणार ...
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करीत असलेल्या (Railway Passengers) प्रवाशांना रेल्वेस्थानकावर स्वस्त जेवण, पॅकेज्ड पाणी देण्याबाबत रेल्वे मंडळाने स्पष्ट शब्दात आदेश जारी केले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत गोंदिया स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यत: 6 महिन्यांसाठी ही सुविधा प्रवाशांना जनरल डब्यात मिळणार आहे. यासाठी प्रवास करणार्या प्रवाशांना जेवणासाठी 20 रुपये तर पाणी 200 मिली बॉटल्सकरिता 3 रुपये द्यावे लागणार आहे.
प्रवाशांच्या सुविधांचा आढावा
रेल्वेतील जनरल डब्यातील प्रवाशांच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी (Railway Passengers) प्रवाशांना जेवण व पाण्यासाठी ताटकळत राहावे लागते. रेल्वेच्या जनरल डब्यात प्रायोगिक तत्त्वावर जेवण आणि पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले.
दर्जेदार सीलबंद अन्न
नागपूर विभागाअंतर्गत येत असलेल्या गोंदिया स्थानकावर, वैध परवानाधारकाला जनरल डब्याजवळ सर्व्हिस काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथून प्रवाशांना दर्जेदार सीलबंद पॅकमध्ये अन्न उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या जेवणाच्या सीलबंद पॅकमध्ये 7 पुरी, सुक्या बटाट्याची करी आणि लोणच्याचा समावेश असेल. जेवणाचे पॅकेट जीएसटीसह 20 रुपये आणि 200 मिली पिण्याचे पाणी 3 रुपयांना मिळणार आहे.
खाद्यपदार्थांची कॉम्बो पॅकेट
यशिवाय कॅसरोलमध्ये प्रादेशिक पदार्थांसह खाद्यपदार्थांची कॉम्बो पॅकेट विकण्यासही रेल्वे मंडळाने परवानगी देण्यात आली आहे. या स्पेशल फूडच्या पॅकेटची किंमत 50 रुपये असून यात मिठाई सुध्दा मिळणार आहे. (Railway Passengers) नव्या व्यवस्थेमुळे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणार्या प्रवाशांना आता त्यांच्या डब्याजवळ जेवणाचे पॅकेट आणि पाणी उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. यामुळे प्रवाशांना अन्नपाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे भटकण्याची गरज राहणार नाही.