Monsoon Update : राज्यात लवकरच बरसणार; येत्या दोन दिवसांत होणार मॉन्सूनचे आगमन; उकड्यापासून मिळणार दिलासा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Monsoon Update : राज्यात लवकरच बरसणार; येत्या दोन दिवसांत होणार मॉन्सूनचे आगमन; उकड्यापासून मिळणार दिलासा

दि. २१.०६.२०२३

Vidarbha News India

Monsoon Update : राज्यात लवकरच बरसणार; येत्या दोन दिवसांत होणार मॉन्सूनचे आगमन; उकड्यापासून मिळणार दिलासा

विदर्भ न्यूज इंडिया 

पुणे : यंदा एल निनो आणि बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून लांबणीवर पडला आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. बळीराजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. मात्र, लांबणीवर पडलेला हा पाऊस येत्या दोन दिवसानंतर राज्यात बरसणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

साधारणत: २३ तारखेनंतर हा पाऊस बरसणार आहे. यामुळे वाढत्या उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळणार आहे.

राज्यात २३ तारखेनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी मॉन्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये येतो तर ९ जून पर्यंत मॉन्सूनचे राज्यात आगमन होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य मॉन्सूनने व्यापले असते. मात्र, या वर्षी मॉन्सूनने ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस लांब आहे. यामुळे राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, पावसाची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. या वर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता या पूर्वीच हवामान विभागाने वर्तवली आहे. जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस बरसेल. पुणे आणि मुंबई परिसरात २३ नंतर राज्यात हलक्या सरी पडण्यास सुरुवात होणार आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पुणे इथे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी पुढच्या दोन महिन्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. पावसावर एल निनोचा खूप परिणाम जाणवणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीसाठी पोषक वातावरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात तयार होईल. पावसाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->