दि. २१.०६.२०२३
जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे जागतिक योग दिवस साजरा
विदर्भ न्यूज इंडिया
चामोर्शी : आज दिनांक 21 जुन 2023 रोज बुधवारला जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा माल येथे 'जागतिक योग दिन' मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी योग दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शा.व्य. समितीचे अध्यक्ष सन्माननिय धनराज बुरे , प्रमुख अतिथी म्हणुन लख. बोरी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननिय हेमंत चावरे सर ,शा. व्य. समितीचे माजी उपाध्यक्ष निलकंठ सोमनकर उपस्थित होते, तसेच शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोईनवार सर, शाळेतील पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर, अशोक जुवारे सर, राजकुमार कुळसंगे सर, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव निशाने, सचिन तुंबडे, राकेश नैताम, मानिक घोगरे, अंगनवाडी सेविका सौ. पुष्पाताई बुरे, पुष्पा मोहुर्ले, तसेच गावातील नागरिक संजय शिंदे, धनराज शिंदे, मितेश गोविंदवार, पवन मानकर, विनोद बाविस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जागतिक योगदिनानिमित्य योगाचे महत्व, योगा केल्याने शरीराला होणारे फायदे यासंबंधिची माहिती देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बोईनवार सर यांनी केले. त्यानंतर वार्म अप करुन योग करण्याअगोदर योग प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक ताडासन, भ्रामरी, अनुलोम विलोम, कपाल भारती, शवासन, ईत्यादी योग प्रकार करुन योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. कुळसंगे सर यांनी केले तर आभार श्री. जुवारे सर यांनी मानले.