दि. ३०.०६.२०२३
Vidarbha News India
शेतकऱ्यांसाठी आता पीएम प्रणाम योजना! वाचा सविस्तर...
विदर्भ न्यूज इंडिया
PM Pranaam मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत पीएम प्रणाम योजनेला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. र्यायी खतांचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत मार्च 2025 पर्यंत 3.68 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. हा पैसा राज्यांना सबसिडी म्हणून दिला जाईल.
पीएम प्रणाम योजनेद्वारे PM Pranaam खत अनुदानाचा वाढता बोजा कमी करणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांची पोषण गुणवत्ता कमी होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या पॅकेजला मंजुरी दिली. यामध्ये पुढील तीन वर्षांत युरिया अनुदानावर ३.६८ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. 2025 पर्यंत 3.68 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. हा खर्च खत अनुदानावर केला जाणार आहे.