दि. २३.०६.२०२३
नागपूर : स्कूल ऑफ स्कालर्स बेलतरोडी येथे योग दिवस उत्साहात साजरा
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर ब्यूरो : दरवर्षी प्रमाणे यावर्षी स्कूल ऑफ स्कालर्स बेलतरोडी येथे 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी मन व निरोगी शरीर राखण्यासाठी योगाचे महत्त्व वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय मुगदल यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये निलेश विटाळकर, विशाल कारंडे, उषा मुदगळ, मेघा विटाळकर उपस्थित होते.
आमच्या विद्यार्थी प्रतिनिधींना पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत केले. विद्यार्थी आणि कर्मचारी सदस्यांनी प्रशिक्षीत योग शिक्षकांकडून योगाची आसने शिकली, तसेच नम्र शांती मिळवली. प्रशिक्षकांनी आसनांची दरम्यान योगाचे नियम व प्रत्येक आसन कसे करावे हे सविस्तर पणे सांगितले. स्कूल ऑफ स्कालर्स बेलतरोडी येथे योग दिनाचा समारोह योगाचे फायदे आणि एकूण आरोग्यवर त्याच सकारात्मक परिणाम या विषयावर जागरूकता परखणारा एक जबरदस्त सोहळा यशस्वी ठरला. शाळेच्या प्राचार्या डॉ. उमा भालेराव यांनी योग दिन सुरळीत पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना शुभ आर्शिवाद दिले तर क्रीडा शिक्षक व शिक्षिका चारुशीला शेट्टीवार, सतीश भालेराव, अक्षय इंगळे, सचिन चौधरी, तन्मय पिंपळे व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.