राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्या - केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्या - केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव

दि. २३.०६.२०२३

Vidarbha News India

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्या - केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला मिशन लाइफचा नारा दिला आहे. मिशन लाईफ ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जन चळवळ आहे.

जे पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी वैयक्तिक तसेच सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देते. मिशन लाईफमध्ये सामील होऊन आपण जागतिक हवामान कृतीत योगदान देऊ शकतो तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे असे आवाहनही केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.

केंद्रीय कामगार व स्वयंरोजगार आणि पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी २३ जुन राेजी गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरूश्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, नव संशोधन केंद्राचे संचालक मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक निलेश शर्मा तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी,अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममधील वनवासी हितरक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर , सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरनुले, प्रा. रुपेंद्र गौर, ग्रामसभेचे सदस्य आदी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सामाजिक दायित्वातून गौणवन उपजाच्या क्रिया कलापांशी ग्रामसभा क्षमता सक्षमीकरण व प्रशिक्षण केंद्र गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ एप्रिल २०२२ पासून सुरू झाले आहे. स्थानिकांनी कोणत्या गोष्टी संकलन आणि साठवणूक करून त्याच्या विक्रीत प्रावीण्य कसे मिळवता येईल, पेसा कायदा म्हणजे, काय जैवविविधता, मनरेगा अशा सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना अवगत होण्यासाठी हा प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाविषयी त्यांनी मंत्री महोदयांना अवगत करून दिले.

यावेळी मंत्री महोदयांनी काही उपक्रमांचे कौतुक करून विद्यापीठाच्या विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा मधील वनवासी हित रक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर यांनी ग्रामसभांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला एकल प्रकल्प देशासाठी मॉडेल आहे.

तसेच त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.

आमदार डॉ. देवराव होळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर एकल ग्रामसभा आणि विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र यात सुरू असलेल्या उपक्रमाविषयी प्रकल्पाचे समन्वयक डॉ.नरेश मडावी आणि कार्यक्रम प्रमुख विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र आशिष घरई यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे विस्तृत माहिती दिली.

एकल प्रकल्पाच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर आणि तसेच नियाज मुलानी यांनी संयुक्त रित्या  ग्रामसभेचे क्षमता सक्षमीकरण आणि ग्रामसभेंनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग साठी कसे प्रयत्न केले जाते याविषयी माहिती दिली  नवसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. मनीष उत्तरवार यांनी ट्रायसेपच्या माध्यमातून कशा प्रकारे नव उद्योजक घडवल्या जात आहेत याविषयी यावेळी सांगितले. मॉडेल कॉलेजचे समन्वयक डॉक्टर संदीप लांजेवार यांनी जांभळी गावात विद्यापीठ आपल्या गावात हा उपक्रम कसा सुरू आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरुनूले यांनी सामूहिक वन हक्क बाबत जास्तीत जास्त अधिकार कसे देता येईल याबाबत मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक रुपेंद्र कुमार गौर यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामसभा आणि महा ग्रामसभा यांच्या सदस्यांनी त्यांचे यशस्वी अनुभव कथन केले.

यावेळी ग्रामसभेच्या सदस्यांनी ज्या लोकांना सामूहिक वन हक्क प्राप्त झालेले आहे. अशा वनभूमीचे सीमांकन करणे, शासन दरबारी नोंद होणे, वनविभागाचे निधी ग्रामसभांना सरळ देता येईल यासाठी कारवाई करणे या मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच सृष्टी संस्था आणि दिनबंधू समाज विकास संस्था देवरी यांनी मागण्यांचे निवेदन यावेळी सादर केले. या बैठकीचे संचालन आणि आभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Ad

-->