दि. २.०६.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : तेंदूपानांची जाळपोळ : नक्षलवाद्यांवर संशय..!
- तेंदूपाने बीडीच्या उद्योगातील कच्चा माल
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली - धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमवेरील गावात ३१ मे च्या रात्री नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची ( तेंदूपाने म्हणजे बीडीच्या उत्पादन उद्योगातील महत्त्वाचा कच्चा माल) जाळपोळ करण्यात आली.
छात्तीसगड सीमेवर नक्षल्यांचा हैदोस; तेंदूफळींची जाळपोळ, नागरिकांमध्ये दहशत.
तेंदूच्या माध्यमातून आदिवासींना उत्पन्न मिळते. यातून नक्षलवाद्यांनाही मोठ्या प्रमाणात खंडणी मिळते; मात्र मागील वर्षी अल्प भाव मिळाल्याने अनेक ठिकाणी तेंदूपानांची मजुरी घसरली आहे.
तेंदूपाने
काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना रसद मिळत नाही. परिणामी गेल्या १० दिवसांपासून त्यांनी तेंदूफळींची जाळपोळ चालू केली. पोलीस अधिकार्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.