दि. १.०६.२०२३
Vidarbha News India
ज्यास्त दराने विक्री, बोगस खते विक्री करणे पडले महागात, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित...
विदर्भ न्यूज इंडिया
सध्या पावसाळा तोंडावर आहे. कृषी विभागाकडून कृषी केंद्राची भरारी पथकाकडून तपासणी केली जात आहे.
अनेक ठिकाणी ज्यादा दराने विक्री केली जात आहे.
आता ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणे, खताची लिंकिंग, बोगस खते व बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंदवही, विक्री परवाने इत्यादी कागदपत्रांची तपासणीत त्रुटी आढळल्याने राहुरी, पारनेर व नेवासा तालुक्यांतील प्रत्येकी एका कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.
यामुळे आता कारवाई सुरू झाल्याने कृषिसेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट थांबण्याची आशा वाढली आहे. सध्या पथके कृषी सेवा केंद्राची तपासणी करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणे, खताची लिंकिंग, बोगस खते व बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंदवही, विक्री परवाने इत्यादी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. नगर जिल्ह्यात खरिपाच्या पाश्वभूमीवर कृषी विभागाने भरारी पथके नियुक्त केली आहेत.
दरम्यान, विक्री परवाने इत्यादी कागदपत्रांची तपासणीत त्रुटी आढळल्याने राहुरी, नेवासा, पारनेर येथील प्रत्येकी एक कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला. तसेच काही कृषी सेवा केंद्राना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले आहेत.