गोंडवाना विद्यापीठात जागतिक योगदिनाचे आयोजन... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठात जागतिक योगदिनाचे आयोजन...

दि. १९.०६.२०२३
Vidarbha News India
गोंडवाना विद्यापीठात जागतिक योगदिनाचे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारत  सरकार आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार २१ जून  या दिवशी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी २०१४ च्या राष्ट्रीय महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा आंतरराष्ट्रीय योगदिन  गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात बुधवार (ता. २१) सकाळी ६ वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या  शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,आर्ट ऑफ लिविंग ,पतंजली योग परिवार, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब , मनस्विनी मंच, सखी मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका मुख्यालयी व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात येते. सर्वांचे सार्वजनिक आरोग्य आणि निरोगीपणा जपण्यासाठी त्याचे महत्त्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून
योगाचा सराव सुरू ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे, हे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे उद्दिष्ट आहे.  जिल्ह्यातील व शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटू, महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शासकीय कार्यालयातील व शासनाच्या विविध विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जास्तीत संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन तसेच संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा डॉ. अनिता लोखंडे यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->