दि. ०८.०७.२०२३
Vidarbha News India
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात! दुचाकीची समोरा समोर धडक होऊन ३ ठार.!
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने 2 जण जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या घटनेमध्ये 3 जन गंभीर जखमी झाले. दोन्ही दुचाकीवर तीन तीन व्यक्ती बसले होते असे सांगितले जात आहे. हा अपघात काल रात्री च्या सुमारास घडला.
हरीश पांडुरंग सहारे (वय 35) रा. नांदगाव (तालुका सिदेवाही), सागर रघुनाथ शेडमाके (वय 22) रा.हिरापुर, प्रशांत आत्राम (वय 30) रा. हिरापूर (तालुका सावली) अशी मृत्तकांची नावे आहेत. जखमींमध्ये अजय विजय गोरडवार (वय 32) रा.सावली, सुमित शेडमाके रां.हिरापूर, प्रशांत चावरे रां. नांदगाव यांचा समावेश आहे.
जखमींना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. असून घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली सावली पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे हिरापुर आणि नांदगावात शोककळा पसरली आहे.