दि. ०८.०७.२०२३
Vidarbha News IndiaRahul Gandhi Rides Tractor: राहुल गांधी थेट शेताच्या बांधावर, पहाटे शेतात केली भात लावणी; ट्रॅक्टरही चालवला
Rahul Gandhi News :
विदर्भ न्यूज इंडिया
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या मजुरांसोबत काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत वाहने दुरुस्त करणाऱ्या दुकानात काम करण्याचा अनुभव घेतला.
शेतात केली भात लावणी
राहुल गांधी हिमाचल प्रदेश येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात सोनीपत येथील मदीना गावात भात लावणी सुरू होती. त्यावेळी अचानक राहुल गांधी हे भात लावणी करण्यासाठी शेतात पोहोचले.
राहुल गांधी यांनी यावेळी मजुरांसोबत शेतात लावणी केली, त्यासोबत शेतात ट्रॅक्टरही चालवला. यावेळी त्यांनी शेतात मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधींना अचानक पाहून शेतातील सर्वच मजूर चकीत झाल्याचे पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे दिल्ली येथील करोल बाग येथील सायकलच्या बाजारात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी बाजारातील कामगार आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी गांधी यांनी गॅरेजवाल्यांशीही संवाद साधला. सायकलच्या बाजाराला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भरपूर गाजली. यानंतर आता राहुल गांधी सामान्य लोकांशी थेट संवाद साधताना दिसत आहे. याआधी राहुल गांधी हे २३ मे रोजी दिल्ली ते चंडीगढचा प्रवास ट्रकने केला होता. यावेळी गांधी यांनी ट्रक चालकांशी संवादही साधला होता.