विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून, मंत्रिमंडळ विस्तार गुलदस्त्यात.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून, मंत्रिमंडळ विस्तार गुलदस्त्यात.!

दि. ७ जुलै २०२३

Vidarbha News India

Monsoon Session 2023 : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून, मंत्रिमंडळ विस्तार गुलदस्त्यात.!

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

त्यावेळी या फुटलेल्या आमदारांचा कस लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभाग घेऊन राज्यभरात खळबळ उडवली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाने राज्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच आता महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुद्दा गुलदस्त्यातच आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप होण्याची शक्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रविवारी अजित पवार दाखल झाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळात फक्त कॅबिनेट मंत्री : मंत्रिमंडळात फक्त कॅबिनेट मंत्री असू शकतात आणि राज्यमंत्री नसतात अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानी दिली आहे. मात्र एक-दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी आघाडीत गेल्याने शिंदे छावणीत अस्वस्थता पसरली आहे, अशी चर्चा आहे.

सहा आमदारांनी आपण शरद पवार गटात असल्याचे दिले मेसेज : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. मात्र 19 आमदारांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती पवार गटाच्या सूत्रांनी दिली आहे. यातील सहा आमदारांनी आपण शरद पवार गटातच असल्याचे मेसेज पाठवले आहेत, असेही यावेळी यावेळी सांगण्यात आले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->