दि. २४.०७.२०२३
Vidarbha News India
Chandrapur Crime News: चंद्रपुरातील राजुरा शहरात पुन्हा गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू.!
Chandrapur Rajura City Firing:
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली. चंद्रपुरातील राजुरा शहरात रविवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पुन्हा एकदा गोळीबार केला.
या गोळीबारात भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पूर्वशा सचिन डोहे (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. पूर्वशा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन यांची पत्नी आहे. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर (Chandrapur) येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी सचिन डोहे यांच्या घरासमोरून एका व्यक्तीवर गोळीबार (Crime News) केला. गोळीबाराचा आवाज आल्याने पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमी लल्ली यास चंद्रपूरला हलविण्यात आले असून नेमका गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला यावर प्रश्नचिन्ह आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.