वाढदिवसाच्या दिनीच देवेंद्र फडणवीसांना करावा लागला गडचिरोलीचा दाैरा रद्द; जाणून घ्या कारण... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

वाढदिवसाच्या दिनीच देवेंद्र फडणवीसांना करावा लागला गडचिरोलीचा दाैरा रद्द; जाणून घ्या कारण...


दि. २२.०७.२०२३

Vidarbha News India

Devendra Fadnavis News : 

वाढदिवसाच्या दिनीच देवेंद्र फडणवीसांना करावा लागला गडचिरोलीचा दाैरा रद्द; जाणून घ्या कारण...

विदर्भ न्यूज इंडिया

Gadchiroli Rain Updates : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचा गडचिरोलीचा दाैरा रद्द झाला आहे. फडणवीस हे अहेरी येथील दौ-यावर हाेणार येते.

दरम्यान गडचिराेली जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती (gadchiroli floods) निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरसरी 56 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

आज (शनिवार) सकाळी पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 13 मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यामध्ये सर्वाधिक पाऊस चामोर्शी 189 मिलीमीटर, अहेरी 154, पेरमिली मंडळात 119 मिलीमीटर पाऊस झाला.

जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या (rain) पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीच्या अहेरी येथील दौराही रद्द करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->