विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी.!

दि. 22.07.2023

Vidarbha News India

Vidharbha Rain Update: 

विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी.!

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील (Vidharbha) अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी देखील विभागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडतांना पाहायला मिळाले.मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढले आहे.

या मुसळधार पावसात वीज पडल्यानं सात जणांचा मृत्यू झाला असून एकाचा भींत कोसळून मृत्यू झाला आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं त्यात वाहून गेलेल्या तीन जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

तर विदर्भात विविध ठिकाणी वीज पडल्यानं 30 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. शुक्रवारी पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडल्यानं पाच जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झालेत. आज सकाळी यवतमाळ येथे भींत कोसळून एकाचा मृत्यू झाला असून गुरुवारी अमरावती इथं वीज पडल्यानं दोघांचा म्हणजे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मधील 48 तासांपासून विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरात वर्धा येथील एक तर अकोला येथील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. बचाव पथक या तिघांचाही शोध घेत असून अद्यापही या तिघांचाही शोध लागलेला नाही.

वीज / भिंत कोसळून मृत्यू

भंडारा 03 (वीज पडून)
गोंदिया 02 (वीज पडून)
यवतमाळ 01(भिंत कोसळून)
अमरावती 02 (वीज पडून)

पुरात वाहून गेलेले

  • वर्धा - 01
  • अकोला - 02

विदर्भात रेड अलर्ट

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हा सुट्टीचा आदेश रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यात देण्यात आला आहे. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

अडान नदीला पूर

यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडान नदीला पूर आला आहे. त्यामुळं बोरीअरब जवळच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळं यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता त्या ठिकाणी बरेकेट्स लावण्यात आली आहेत. पाणी पुलावरुन वाहत असताना कोणी यावरुन जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->