दि.१२.०७.२०२३
Vidarbha News India
संदीप लांजेवार PHD आचार्य पदवीने सन्मानित...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेज येथे कार्यरत असलेले डॉ. संदीप मनोहर लांजेवार यांना गोंडवाना विद्यापीठाने नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात (दीक्षांत समारंभ) आचार्य पदवीने सन्मानित केले.
त्यांनी फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुरेश खंगार यांच्या मार्गदर्शनात 'गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणार्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यामुळे ग्रामीण भागात झालेले परिवर्तन एक-चिकित्सक अध्ययन' या विषयावर संशोधन केले होते. Sandeep Lanjewar यापुर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पात्रता परिक्षा (सेट) सुद्धा उत्तीर्ण केली आहे. गोंडवाना विद्यापीठाने दहाव्या दीक्षांत समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनील हिरेखन, परिक्षा व मुल्यमान मंडळाचे प्रभारी संचालक देवेंद्र झाडे, अधिष्ठाता डॉ. अनील चिताडे, चंद्रमौली आदी मान्यवरांच्या उपस्थित संदीप लांजेवार यांनी आई प्रमिला मनोहर लांजेवार यांच्या उपस्थितीत आचार्य पदवी स्वीकारली.