महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली यांची शिक्षणाधिकारी यांच्याशी वेतनाबाबत भेट व चर्चा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली यांची शिक्षणाधिकारी यांच्याशी वेतनाबाबत भेट व चर्चा

                         दि. १२.०७.२०२३                                     
Vidarbha News India
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली यांची शिक्षणाधिकारी यांच्याशी वेतनाबाबत भेट व चर्चा                                                                  विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसह, माहे जुन २०२३ च्या वेतनाबाबत मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री विवेक नाकाडे साहेब यांचेशी प्रत्यक्ष भेट व चर्चा                                    
दिनांक ११ जुलै २०२३ ला जि.प.प्रशासनासोबत माहे जुन २०२३ चे वेतनाबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता माहे जुन चे वेतन पुढील आठवड्यातच होणार असल्याची माहिती मिळाली. वेतनास उशीर झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने जि.प.प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच यापुढील महीण्यापासुनचे वेतन निर्धारित व विहीत वेळेत होण्यासाठी वेतन प्रक्रियेत गतिमानता आणण्यात यावी अशी मागणी म.रा.प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने  मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब, मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी साहेब,मा.शिक्षणाधिकारी साहेब जि.प.गडचिरोली यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.                          
आजच्या भेटीप्रसंगी चर्चेवेळी म.रा.प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव राॅयसिडाम,जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे, जि.प.प्रशासनाच्या वतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार साहेब, यासह शिक्षक संघाचे धानोरा तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम गायकवाड, अजय आलुरवार, दिलीप देवतळे, सत्यवान मेश्राम, बालाजी पवार, रविंद्र आडे, राजेंद्र सहारे, आनंद हेमके, नुरखाॅ पठाण, विजय नंदनवार, किशोर हेमके, मामीडवार सर, प्रतिभा बारापात्रे, वर्षा मेश्राम, सरिता देविकर, वर्षा गौरकर, छाया ठेंगळे, गीता कापगते आदी मान्यवर उपस्थित होते.                                                

यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक संवर्गाच्या खालील प्रलंबित समस्यांवर सुद्धा मा.शिक्षणाधिकारी श्री.विवेक नाकाडे साहेब यांचेसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.                                                     
१) गडचिरोली जिल्हातील प्राथमिक शिक्षकांचे माहे जुन     २०२३ चे नियमित वेतन त्वरित अदा करण्यात यावे.    
२) जि.प.मधील शिक्षण समितीवर आमच्या संघटनेतील    एक प्रतिनिधी (आमंत्रित सदस्य) म्हणुन घेण्यात यावे.  
३) समाजशास्त्र विषयाच्या पात्र विषय शिक्षकांना पदवीधरची वेतनश्रेणी लावण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी.                                          
४) गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षक कर्मचारी यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता अदा करण्याकरिता Tab (Add HRA) शालार्थ प्रणालीत पुर्ववत सुरु करण्यात यावी.    
५) जिल्ह्यातील विस्तार अधिकारी (शिक्षण),केंद्रप्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक व बांगला भाषिक शिक्षकांची ची रिक्त पदे त्वरीत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.  
६) माहे जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ आणि माहे जानेवारी २०२३ ते जुन २०२३ पर्यंत एकुन १२ महिन्यांची महागाई भत्ता ४ टक्के थकबाकी माहे जुलै २०२३ च्या वेतना सोबत अदा करण्यात यावी.                                                
७) गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या हप्त्याची थकबाकीची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी.    

८ ) गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित  असलेली सर्व प्रकारची थकीत बिले निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली निधीची तरतूद त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावी.                                                            
९) जि.प.गडचिरोली अंतर्गत कार्यरत पाञ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ तात्काळ लागु करण्यात यावे,याबाबत चर्चा करण्यात आली.                            
१०) मुलचेरा व अहेरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अजुनही जि.पी.एफ.ला जमा करण्यात आलेला नाही,त्या शिक्षकांचा पहिला हप्ता त्वरीत जमा करण्यात यावा.                          

याप्रसंगी चर्चा करतांना मा.शिक्षणाधिकारी श्री नाकाडे साहेब यांनी निवेदनात नमूद बहुतांश समस्यां येणाऱ्या पुढील काही दिवसांत निकाली काढण्यासाठी जि.प.प्रशासना कडून प्रयत्न सूरु असल्याचे उपस्थित शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->