दि. २१.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : कुऱ्हाडीने वार करत पत्नीची निर्घृण हत्या!, मुलगी गंभीर जखमी; साधूच्या वेशात लपलेल्या नराधमाला उत्तरप्रदेशात अटक..!
Gadchiroli crime news:
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/कोरची : गडचिरोली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली आहे. बाबा आपल्या आईला मारत असल्याचं पाहून मुलगी आईच्या बचावासाठी पुढे आली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गडचिरोलीच्या (Gadchiroli) कोरची तालुक्यातील कोचीनारा गावात ही भयंकर घटना घडली आहे. जखमी मुलीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी सापळा रचून आरोपी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हत्येनंतर आरोपी पती गावातून फरार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावनातील ललितआश्रम परिसरातून त्याला अटक केली आहे. येथे आरोपी पत्नीची हत्या करून साधूच्या वेशात लपून बसला होता. प्रीतराम भक्तू धकाते (वय ४८) रा. कोचीनारा असे आरोपी नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याला जावई आणि मुलाने मारहाण केली होती. त्यामुळे तो पत्नी (Wife) आणि मुलीकडे राहायला गेला. मुलगा आणि जावयाचा राग त्याच्या मनात तसाच होता. याच रागातून त्याने २ जुलै रोजी आपल्या पत्नीची हत्या केली.
गावातील अन्य महिलांना जीवे मारण्याची धमकी
पत्नी आणि मुलगी गावात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी पत्नी रेखा यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तर प्रतिकार करणारी मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर जखमी केले.
दरम्यान, जंगलात सरपनासाठी या दोघींसोबत शेजारील गावातील काही महिला होत्या. त्यांना सुद्धा आरोपीने धमकावले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले होते. परंतु आरोपीला अटक झाल्यानंतर गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.