दि. ११.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : बसच्या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली आगारातून चंद्रपूर मार्गे राज्य परिवहन महामंडाळाची bus accident बस मार्गक्रमण करीत असतांना अचानक समोर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या नादात चक्क फुटपाथवर चढली. यादरम्यान बसखाली दुचाकी आल्याने दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना सोमवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कॉम्पलेक्स बसस्थानकासमोर घडली.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली आगारातून एम. एच. 14 बी.टी. 1676 क्रमांकाची बसत चंद्रपूरमार्गे निघाली होती. दरम्यान, कॉम्प्लेक्स बसस्थानकासमोर अचानक एक महिला बससमोर आली. बसचालकाने वेळीच प्रसंगावधनाने bus accident बस बाजुला काढली. मात्र, यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक देत बस चक्क रस्त्यालगतचे कठडे तोडून फुटपाथवर चढल्या गेली. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अपघात झाल्याचे निदर्शनास येताच वाहतूकदारांसह नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती.
त्यामुळे काही काळ वाहतूकही प्रभावित झाली. गडचिरोली पोलिसांना माहिती प्राप्त होताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळावरुन बाजुला करीत वाहतूक पुर्ववत सुरु केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.