दि. १२.०७.२०२३
Vidarbha News India
नंदिनी इंडस्ट्रीजच्या रिताली दिलीप मस्के यांना 50 लाखांचा धनादेश...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत Nandini Industries गडचिरोली एमआयडीसी मध्ये सिमेंट विटा निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी नंदिनी इंडस्ट्रीजच्या रिताली दिलीप मस्के यांना 50 लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आदींची उपस्थिती होती. आमदार होळी यांच्या मेक इन गडचिरोली अंतर्गत सदर उद्योगाला चालना मिळाली असून त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून या Nandini Industries उद्योगाची सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया नंदिनी इंडस्ट्रीच्या संचालिका रिताली मस्के यांनी यावेळी दिली. शासकीय योजनेचा लाभ मिळवुन दिल्याबद्दल जिल्हाधीकारी, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र तसेच राज्य सरकारचे यावेळी त्यांनी आभार मानले.