दि. २७.०७.२०२३
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : २९ जुलै, २०२३ या दिवशी भारतीय शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करणाऱ्या शैक्षणिक धोरणास तीन वर्ष पूर्ण होत असल्यामुळे दि. २४-२९ जुलै या कालावधीत गोंडवाना विद्यापीठात " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह " साजरा होत आहे. या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन दि.२८ जुलै रोजी, दुपारी १ वाजता गोंडवाना विद्यापीठात करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेला विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर डॉ. संजय ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, पालक,संस्थाचालक,प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याकरीता ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या विषयावर पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पीपीटी सादरीकरण या स्पर्धांचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाकडून दि.२८जुलै रोजी करण्यात आले.