कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी सुरु केली भरती, अर्जाची पद्धत, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी सुरु केली भरती, अर्जाची पद्धत, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या...

दि. २७.०७.२०२३

Vidarbha News India

कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी सुरु केली भरती, अर्जाची पद्धत, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या...

SC JE Recruitment 2023: 

विदर्भ न्यूज इंडिया

कर्मचारी निवड आयोगातर्फे ज्युनिअर इंजिनिअर( सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परिक्षा २०२३ साठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्यामुळे अर्जाची प्रक्रिया आज २७ जुलै पासून सुरु होत आहे.

इच्छूक आणि योग्य उमेदवार ऑफिशिअर वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १६ ऑगस्ट आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्विकारला जाणार नाही.

नोटिफिकेशननुसार, जेई परीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. अशी माहिती मिळते आहे की, अर्जाची प्रक्रिया संपल्यानंतर आयोगातर्फे परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. अशावेळी उमेदवारांना सल्ला दिला जातो की, ऑफिशिअल वेबसाइटवर लक्ष ठेवा.

भरती तपशील
बीआरओ
जेई (सी): ४३१
जेई (ईएंडएम): ५५

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग
जेई (सी): ४२१
जेई (ई): १२४

केंद्रीय जल आयोग
जेई (सी): १८८
जेई (एम): २३

फरक्का बॅरेज प्रकल्प
जेई (सी): १५
जेई (एम): ६

लष्करी अभियांत्रिकी सेवा
जेई (सी): २९
जेई (ईएंडएम): १८

बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (अंदमान लक्षद्वीप हार्बर वर्क्स)
जेई (सी): ७
जेई (एम): १

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन
जेई (सी): ४
जेई (ई): १
जेई (एम): १
एकूण रिक्त जागा : १३२४

अर्जाची पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

अधिसुचना – https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/NOTICE_JE_2023_26072023.pdf

अर्ज शुल्क

SSC JE 2023 साठी अर्ज शुल्क रु. १०० आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), PWBD आणि माजी सैनिकांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

SSC JE 2023 भरतीसाठी अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
यानंतर, वैयक्तिक तपशील भरून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
त्यानंतर लॉगिन करून फॉर्म भरा.
फॉर्मची एक प्रिंट डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Share News

copylock

Post Top Ad

-->