अजित पवारांनी ट्विटरचं प्रोफाईल बदललं; आता 'उपमुख्यमंत्री' असा उल्लेख! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अजित पवारांनी ट्विटरचं प्रोफाईल बदललं; आता 'उपमुख्यमंत्री' असा उल्लेख!

दि. २ जुलै २०२३

Vidarbha News India

Maharashtra Politics: अजित पवारांनी ट्विटरचं प्रोफाईल बदललं; आता 'उपमुख्यमंत्री' असा उल्लेख!

Maharashtra Political Crisis: 

विदर्भ न्यूज इंडिया

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार ( Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिला. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या ट्विटर हँडलचं प्रोफाईल बदललं आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये 'उपमुख्यमंत्री' (Deputy Chief Minister) पदाचा उल्लेख केला आहे.

अजित पवारांच्या ट्विटर प्रोफाईलवर राष्ट्रवादीचा झेंडा होता. आता अजित पवारांनी स्वत:चा फोटो आणि त्याखाली बायोमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षात आता फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर देखील अजित पवारांनी दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे, तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार देखील अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होत आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले आणि पहाटेच्या शपथविधीनंतर 72 तासांत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार पडलं होतं. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे, त्यामुळे दुपारचा शपथविधी पहाटेच्या शपथविधीवरचा डाग मिटवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणी शपथ घेतली?

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

याआधी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

 

Share News

copylock

Post Top Ad

-->