दि. २८.०७.२०२३
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : या वर्षी पासून पदव्युत्तर शैक्षणिक विभागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुरु होत आहे. त्याचा व्यापक प्रचार प्रसार व्हावा .याचे काय फायदे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय , विद्यार्थ्यांना याचे आकलन झाले पाहिजे . यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या नव्या धोरणा चे समाजात असलेले गैरसमज दूर झाले पाहिजे. शेवटच्या घटका पर्यंत ते पोहचले पाहिजे हीच शासनाची आणि विद्यापीठाची भूमिका आहे. असे प्रतिपादन विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर डॉ.संजय ठाकरे यांनी केले.
२४-२९ जुलै या कालावधीत गोंडवाना विद्यापीठात " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह " साजरा होत आहे. या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता आंतरविद्या शाखा डॉ. सुनील साकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर शैक्षणिक विभागात या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झाले.यासाठी अभ्यासक्रम तयार झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण सर्वांनी स्वीकारावे. या धोरणामुळे संपूर्ण शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असून, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अंगभूत गुणांना वाव मिळून त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे असे मत प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.
संचालन आणि प्रास्ताविक अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे यांनी केले तर आभार उपकुलसचिव विद्या विभाग डॉ. हेमंत बरसागडे यांनी मानले. सदर कार्यशाळेचा लाभ संस्थाचालक,प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक यांनी घेतला.