१ ऑगस्टपासून 'हे' ४ नियम बदलणार, तुमच्या खिशावर परिणाम होणार... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

१ ऑगस्टपासून 'हे' ४ नियम बदलणार, तुमच्या खिशावर परिणाम होणार...

दि. २८.०७.२०२३

Vidarbha News India

१ ऑगस्टपासून 'हे' ४ नियम बदलणार, तुमच्या खिशावर परिणाम होणार...

विदर्भ न्यूज इंडिया

जुलै महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून पैशांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

१ ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊ यात.

एलपीजीच्या किमती बदलू शकतात

एलपीजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. या कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. याशिवाय पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे दरही बदलू शकतात.

ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद राहणार

पुढील महिन्यात अनेक सण येत आहेत. ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्या असतात. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. याबरोबरच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासू शकता.

आयटीआरसाठी दंड भरावा लागणार

आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. या शेवटच्या तारखा त्या करदात्यांच्या आहेत, ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही. या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. उशिरा आयटीआर फायलिंगसाठी करदात्यांना १००० रुपये किंवा ५००० रुपये दंड भरावा लागू शकतो.

जीएसटीसाठी इलेक्ट्रॉनिक पावत्या द्याव्या लागणार

तसेच ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ ऑगस्टपासून इलेक्ट्रॉनिक पावत्या (Electronic Invoice) द्याव्या लागणार आहेत .

Share News

copylock

Post Top Ad

-->