दि. २८.०७.२०२३
गडचिरोली जिल्ह्यात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी पुढाकार घेऊन बैठक लावा;
- देवराव जी डॉक्टर देवराव जी होळी यांची विधानसभेत उद्योग मंत्र्यांकडे मागणी
- कोणसरी पोलाद प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर करा...
- गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या कामाला लवकर सुरुवात...
- हजारो बेरोजगार, नव तरुण युवकांना रोजगाराची संधी मंत्री महोदयांचे उत्तर..
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी काढलेल्या उद्योग रथ क्रांती यात्रेमुळेच आज जिल्ह्यात उद्योगाला भरभराटीचे दिवस...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग क्रांती रथयात्रा काढून जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केला असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग पुन्हा भरभराटीला यावे याकरिता त्या संदर्भातील प्रस्ताव प्रशासन स्तरावरून आपल्याकडे सादर केलेले आहेत. त्या संदर्भात आपण तातडीने बैठक लावून निर्णय घ्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी या उद्योगमंत्री उदय जी सामंत यांच्याकडे विधानसभेत केली.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोणसरी पोलाद प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन स्तरावर आला असून तो तातडीने मंजूर करावा. जेणे करून तेथील नवयुवकांना पुन्हा मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल अशी मागणी केली.
याप्रसंगी मंत्री महोदयांनी गडचिरोली जिल्ह्यातील नव तरुणांसाठी रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आलेली असून यापुढेही रोजगार निर्मिती प्रक्रिया सुरूच राहणार असून २० हजार कोटीच्या गुंतवणुकीच्या उद्योग कामाला सुरुवात झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.