गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी ; - खासदार अशोक नेते यांचे आवाहन.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी ; - खासदार अशोक नेते यांचे आवाहन..

दि. २८.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी ; - खासदार अशोक नेते यांचे आवाहन..
----------------------------------------
नविन मतदारांनी नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजावावा.
(१६ ऑगस्ट २०२३ ही शेवटची तारीख ) 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नव मतदार म्हणजे देशाचा कणा.. ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण तो व्यक्ती प्रथमतः मतदानाचा हक्क बजावू शकतो म्हणूनच प्रत्येक नव मतदार यांचे १८ वर्ष झाले त्यांनी आपले कर्तव्य बजावत मतदार नोंदणी करावी असे आव्हान गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी केले आहे.
त्याच प्रमाणे सबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात, भाजपा तालुका अध्यक्ष यांच्याकडे नव मतदार नोंदणी चे फार्म उपलब्ध असल्यामुळे सर्व युवा व नवीन मतदारांनी आपआपल्या तालुक्यात मतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले आहे.
नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करण्याकरिता खा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात फार्म उपलब्ध आहेत त्याच प्रमाने तालुका अध्यक्ष, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुका ठिकाणींच्या तहसील कार्यालयात जाऊन नव मतदारांनी आपली मतदार नोंदणी करून आपले नाव समाविष्ट करून घ्यावे.नविन मतदारांनी नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजावावा.असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी क्षेत्रांतील जनतेला केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->