दि.३०.०७.२०२३
Vidarbha News India
PMSBY: केवळ 20 रूपयात 2 लाखांचा विमा; जाणून घ्या या सरकारी योजनेची खास वैशिष्ट्ये..
विदर्भ न्यूज इंडिया
PMSBY: केंद्र आणि राज्य सरकारे अनेकदा गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना आणतात. याद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जात असते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील अशीच आहे.
हा अपघात संरक्षण विमा योजना आहे ज्यामध्ये तुम्ही वार्षिक फक्त 20 रुपये गुंतवून 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकता.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे?
ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. देशात एक मोठा वर्ग आहे जो जास्त प्रीमियममुळे विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत सरकारच्या या विशेष योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब वर्गापर्यंत विम्याची सुविधा पोहोचली आहे. या योजनेत फक्त 20 रुपये खर्च करून तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विम्याचा लाभ मिळू शकतो.
लाभ कोण घेऊ शकतो
PMSBY ही एक सरकारी विमा योजना आहे जी 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणीही घेऊ शकते. या विमा योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. दुसरीकडे, अपघातात व्यक्ती अंशतः अपंग झाल्यास, अशा स्थितीत विमाधारकाला 1 लाख रुपयांची रक्कम मिळेल.
प्रीमियम कसा जमा करायचा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेला भेट देऊन PMSBY साठी अर्ज करू शकता. या योजनेतील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ऑटो डेबिट मोडद्वारे दरवर्षी 1 जून रोजी तुमच्या खात्यातून रक्कम आपोआप कापली जाईल.