Traffic Signal गडचिरोली : शहरातील वाहतूक दिवे बनले 'शो-पीस'; सुरु होताच काही दिवसांत पडले बंद.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Traffic Signal गडचिरोली : शहरातील वाहतूक दिवे बनले 'शो-पीस'; सुरु होताच काही दिवसांत पडले बंद.!

दि. ३०.०७.२०२३
Vidarbha News India
Traffic Signal गडचिरोली : शहरातील वाहतूक दिवे बनले 'शो-पीस'; सुरु होताच काही दिवसांत पडले बंद.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली मागील काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य असलेल्या इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे (Traffic Signal) बसविण्यात आले होते. मात्र, हे दिवे अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. तेव्हापासून आजतागायत जवळपास 10 वर्षांचा कालावधी लोटूनही सदर दिवे सुरू करण्यात आलेले नाहीत.
गडचिरोली मागील काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य असलेल्या इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे (Traffic Signal) बसविण्यात आले होते. मात्र, हे दिवे अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. तेव्हापासून आजतागायत जवळपास 10 वर्षांचा कालावधी लोटूनही सदर दिवे सुरू करण्यात आलेले नाहीत. सद्यस्थितीत वाहतूक दिवे केवळ 'शो-पीस' बनले आहेत. त्यामुळे मुख्य चौकात कार्यरत वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक व्यवस्था सांभाळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार, वाहनांची संख्याही वाढली आहे. काही वर्षांअगोदर बसविण्यात आलेले दिवसेंदिवस वाहतूक दिवे अद्यापही सुरू करण्यात न त्यानुसार आल्याने शहरात वाहतूक व्यवस्थेचा काही बोजवारा उडाला आहे. कोण कुठून वाहन टाकेल, याचा काही नेम नाही. वाहतूक दिवे नसल्याने वाहतूक नियमांची ऐसीतैसी होत आहे. मात्र, बंद पडलेले वाहतूक दिवे सुरु करण्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनधारकांना पडलेले वाहतूक दिवे सुरु करण्याकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतव आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल
शहरातील इंदिरा गांधी हा मुख्य चौक शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे शहरातील चारही प्रमुख रस्त्यांवरून धावणाऱ्या चौकातून ये-जा करतात. विशेष म्हणजे, मुख्य चौकात वाहतूक कर्मचारीही तैनात असतात. तरीही अवजड व वाहनांमुळे मुख्य चौकातील वाहतूक प्रभावित होते. नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून वाहतूक दिवे बसविल्यामुळे मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्था बऱ्याच अंशी नियंत्रणात आली होती. मात्र, मागील दहा वर्षांपासून वाहतूक दिवे बंद असल्याने दररोज मुख्य चौकात वाहतूक समस्येचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->