दि. १७.०७.२०२३
Vidarbha News India
Vidarbha Rain Update : राज्यात विदर्भामध्ये दमदार पाऊस...
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर, नागभिड येथे १२० मिलिमीटर, तर गडचिरोली येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः हवामान विभाग) :
कोकण :
मुरबाड, तळा, शहापूर, वाडा प्रत्येकी ५०, वैभववाडी ४०, अंबरनाथ, जव्हार, माथेरान, राजापूर प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र :
गगनबावडा, अक्कलकुवा, इगतपुरी, राधानगरी, लोणावळा प्रत्येकी ५०, पाचोरा, महाबळेश्वर, पेठ, शाहूवाडी, हर्सूल प्रत्येकी ४०, ओझरखेडा, शिरपूर प्रत्येकी ३०.
मराठवाडा :
खुलताबाद, परभणी प्रत्येकी ३०, सेनगाव, भेकरदन, निलंगा, माहूर, कळमनुरी प्रत्येकी २०.
विदर्भ : पाऊस मिली मीटर...
सावली १४० मी.मी , नागभिड १२०, गडचिरोली ११०, देसाईगंज, सडकअर्जूनी, गोंदिया, ब्रह्मपुरी प्रत्येकी ९०, चामोर्शी, धानोरा, अरमोरी, कुरखेडा, आमगाव, कोर्ची, सालकेसा प्रत्येकी ८०, कुही, शिंदेवाही, देवरी, मुलचेरा, पोंभुर्णा, गोंदिया प्रत्येकी ७०, मुल, गोरेगाव, अर्जुनीमोरगाव, एटापल्ली, भिवपूर प्रत्येकी ६०, साकोली, पवनी, लाखनी, अहेरी प्रत्येकी ५०.
घाटमाथा :
दावडी ९०, शिरगाव ८०, कोयना ७०, लोणावळा ६०, वळवण, अंभोणे प्रत्येकी ४०.