दि.१७.०७.२०२३
वंचित बहुजन आघाडीच्या हिंगणा तालुका अध्यक्षपदावर काळे गुरुजी
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर जि. प्रतिनिधी : सतीश भालेराव
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रिय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हिंगणा तालुक्यातील सामाजिक-कार्यकर्ते प्रकाश काळे गुरुजी यांची नियुक्ती करण्यात आली.नागपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विलास वाटकर यांनी प्रकाश काळे गुरुजी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.तसेच लवकरात लवकर हिंगणा तालुका कार्यकारिणी तयार करुन गावागावात वंचितच्या शाखा उघडण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाणे, अतुल शेंडे ,दवलामेटी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम श्रीकांत रामटेके ,नागपूर तालुका उपाध्यक्ष नागेश बोरकर व विनायक इंगळे गुरुजी उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीचे विचार व कार्य समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नवनियुक्त हिंगणा तालुका अध्यक्ष प्रकाश काळे गुरुजी यांनी दिले. या नियुक्तीबद्दल सामाजिक-कार्यकर्ते अनिल पारखी ,गजानन ढाकुलकर ,सिद्धार्थ बोदीले भिमराव हाडके,संजय शेवारे,अमित कठाणे ,गुड्डु यादव,रोशन काकडे ,शिवाजी यादव ,संदिप रहांगडाले ,नंदु सिंग,सुरज यादव,दिपक शहा,अरुण वरठी ,दिलीप गवते,श्याम दडमल,जयराम बरडे ,हरिदास सोमकुवर व विकास गणवीर यांनी अभिनंदन केले.