दि. २४.०७.२०२३
लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनची शपथविधी समारोह संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी सतीश भालेराव
नागपूर : लेट. म. ल. मानकर स्कूल सालई, गोधनी हुडकेश्वर रोड नागपूर, येथे शालेय मंत्रिमंडळ लोकशाही पद्धतीने स्थापन झाला. त्याचबरोबर अग्नी, पृथ्वी, जल, वायू हाऊसेस स्थापित करण्यात आला. या चारही हाऊसच्या विद्यार्थांनी ध्वजाला मानवंदना दिली.त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचे हस्ते सरस्वती पूजन केले. हवन प्रज्वलीत करण्यात आले. विद्यार्थी यांनी हवनामध्ये आहुती दिली व संकल्प केला. पद ग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांचे बॅचेस लावून कौतुक करण्यात आले. तसेच हातात पताका देऊन एक शाळेची जबाबदारी स्वीकारली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून चारही हाऊसचा एक प्रात्यसिक दाखवण्यात आले. पदग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध पद्धतीने शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेल्या डाँ. वैशाली चोपडे मॅम. यांनी आपल्या भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले. व यशस्वी वाटचाल कशी करावी बालक, पालक यांना सांगितले. प्रमुख अतिथी डाँ. दिलीप सेनाड सर यांनी भाषेचे महत्व सांगितले व येथील विद्यार्थी हा समंजस नागरिक बनेल. त्याचबरोबर प्रगती मानकर मॅम यांनी मुलांचे कोड कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल भोंगाडे सर यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकारी विद्यार्थी कु. अनुष्का भगत शाळानायक, कु. कनिष्का जगनीत शाळा उपनायक,कु. पूर्वा भगत शिस्तप्रमुख,कु. सिद्धी चरडे स्वच्छता प्रमुख,सोहम कास्टे क्रीडा प्रमुख,ह्या विद्यार्थ्यांचे सर्वानी कौतुक केले. संस्थेचे संचालिका यांनी डाँ. अपेक्षा गोतमारे मॅम. यांनी बहूसंख्येने उपस्थित असलेल्या पालकांचे अभिनंदन केले. पदग्रही विदयार्थी यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे संचालक नेहा मॅम तर आभार ज्योती मॅम यांनी पार पाडले. पालक वर्ग, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.