दि. ३०.०७.२०२३
Vidarbha News India
सरकारचा नवा निर्णय! रेशनकार्ड नसले तरीही, सर्वांनाच मिळणार आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार..
विदर्भ न्यूज इंडिया
सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून राज्यातील सर्वच घटकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही खुशखबर मानली जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांमध्ये राबविली जात आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो.
या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही. त्यामुळे अनेकजणांना योजना असूनही लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नवीन निर्णय घेत शिधापत्रिका नसली तरीदेखील उपचार देण्याची तरतूद केली आहे.
विशेष बाब म्हणजे योजनांमध्ये आता शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिधापत्रिका नसलेल्यांना रहिवासी दाखला द्यावा लागणार असून योजनेतील प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्र असणार आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र कॉल सेंटरदेखील उभारले जाणार आहे.
कोण असणार लाभार्थी?
- गट - अ : पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब
- गट - ब : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब (शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांसह) व शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब.
- गट- क : गट 'अ आणि ब'मध्ये समाविष्ट न होणारे शासकीय, शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत व महाराष्ट्राबाहेरील बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.
- गट - ड : महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.
जिल्ह्यातील 'या' ५० रुग्णालयात मिळणार लाभ
१) माळशिरस : अकलूज क्रिटिकल केअर ॲण्ड ट्रामा सेंटर, सूर्यवंशी ट्रामा ॲण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, अकलूज, युनिटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नातेपुते.
२) बार्शी : अश्विनी ग्रामीण कॅन्सर रुग्णालय, जगदाळे मामा हॉस्पिटल, कल्याणरावजी भातलवंडे बालरुग्णालय, मित्रप्रेम मल्टिस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, ग्रामीण रुग्णालय, सुश्रुत हॉस्पिटल, सुविधा आयसीयू हॉस्पिटल.
३) सोलापूर : अश्विनी ग्रामीण मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र, कुंभारी, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल), डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल, डॉ. कासलीवाल मेडिकल केअर ॲण्ड रिसर्च फाउंडेशन कासलीवाल हॉस्पिटल, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल, डॉ. लवटे ॲस्ट्रो हॉस्पिटल ॲण्ड ट्रामा केअर युनिट, देवडीकर मेडिकल सेंटर, गजानन लोकसेवा हॉस्पिटल, गंगामाई हॉस्पिटल, ह्दम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, नर्मदा हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, सोलापूर कॅन्सर रुग्णालय, युगंधर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.
४) सांगोला : दक्षता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महूद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सदगुरू हॉस्पिटल आयसीयू ॲण्ड ट्रामा केअर सेंटर, श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, श्रीनंद हॉस्पिटल, वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.
५) पंढरपूर : चिरायू पॅरामेडिकल सुपर स्पेशालिटी ॲण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चिरंजीव हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, लाटे अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल, लाइफलाइन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल, पंढरपूर सुपरस्पेशालिटी ॲण्ड गॅलॅक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सेवा हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, श्री गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, वरद विनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.
६) मंगळवेढा : दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल, शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,
७) मोहोळ : ग्रामीण रुग्णालय.
८) करमाळा : उपजिल्हा रुग्णालय, समर्थ बालरुग्णालय.