दि. ०४.०८.२०२३
Vidarbha News India
Cm Eknath Shinde: आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे.!
Vidhan Sabha Pavsali Adhiveshan:
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. 'आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणातील ठळक 10 मुद्दे जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे
1. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका करत म्हणाले की, "लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधकांची गरज असते. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी विरोधकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधी पक्षनेत्याची निवड होणे आवश्यक होते. मात्र आजच्या इतके कधी नव्हे इतके गोंधळलेले आहेत. त्यांनी आपला आत्मविश्वास गमावलेला आहे. या अधिवेशनात सर्वांना बोलायला संधी मिळाली. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना तयारी करायला वेळ आहे."
2. मोठे उद्योग राज्यातून बाहेर जात आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका जाहीर केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची टीका झाली, मात्र श्वेतपत्रिकेत जाहीर केली. राज्यात एक लाख 18 हजार कोटींनी गुंतवणूक झाली. यामुळे गुंतवणूक राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेले आहे. दावोसमधील झालेल्या एमओयूची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.'' (Latest Marathi News)
3. शिंदे म्हणाले, ''शासन आपल्या दारी उपक्रमातून सव्वा कोटी नागरिकांना फायदा झाला. महाविकास आघाडीत अहंकारामुळे काही प्रकल्प रखडवले होते. ते प्रकल्प युतीचे सरकार आल्यानंतर मार्गी लावले. आम्ही अॅक्शन घेतो, फिल्डवर जाऊन काम करतो, हे सरकार घरी बसून काम करणारे नाही."
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले "वर्षभर सरकार पडणार, पडणार पडणार असे म्हणत होते. दररोज नवीन ज्योतिष तयार होऊन नवीन मुख्यमंत्री होण्याची चर्चाही होत होती. यात नाना पटोलेही आघाडीवर होते. आधी १७० आमदारांचे पाठबळ होते, मात्र विकासाचा वेग पाहून अजितदादाही बरोबर आहे. त्यामुळे संख्याबळ २१५ वर जाऊन सरकार मजबूतच झाले आहे."
5. शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
6. उद्धव ठाकरे यांना टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे.''