दि. २१.०८.२०२३
Vidarbha News India
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दि.२३ ऑगस्टला गडचिरोली दौरा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दि.२३ ऑगस्टला गडचिरोली दौरा जनसंवादयात्रा, महाविजय - २०२४ गडचीरोली जिल्हा दौऱ्याप्रंसगी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने पत्रकार परिषद खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत कार्यक्रमाची रूपरेषा, यशस्वीपणे,नियोजनबद्ध होण्या करिता पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे,किसान आघाडीचे तथा कृ.उ.बा.स. संचालक रमेश बारसागडे,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे सर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,अनिल कुनघाडकर, विनोद देओजवार, संजिव सरकार,केशव निंबोड, भास्कर भुरे,विलास नैताम उपस्थित होते.