राज्यात या आजाराचे संसर्ग, सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, फक्त ११ दिवसांत किती लोकांना झाला आजार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यात या आजाराचे संसर्ग, सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, फक्त ११ दिवसांत किती लोकांना झाला आजार

दि. २२.०८.२०२३

Vidarbha News India

राज्यात या आजाराचे संसर्ग, सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, फक्त ११ दिवसांत किती लोकांना झाला आजार

विदर्भ न्यूज इंडिया

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाच्या आजाराची संसार साथ सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या या साथीपासून लहान मुले सुटलेली नाही. हा आजार संसर्गाच्या असल्यामुळे मुलांना शाळांमधून सक्तीची सुटी घ्यावी लागत आहे.

या संसर्गाची मुले शाळेत आल्यास त्यांना घरी पाठवले जात आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना हा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

राज्यात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. १० ते २० ऑगस्ट या ११ दिवसांत राज्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना डोळे आले आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मागील ११ दिवसांत ९७८८ डोळे आले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये रुग्ण

पुणे शहरानंतर अमरावतीमध्ये ६,७२४, जळगावमध्ये ५,९३०, नांदेड ५,५४८, चंद्रपूर ५,२९२, परभणी ४,६२० इतके रुग्ण सापडले आहे. या आजाराचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

आजारावर काय आहे उपाय

डोळे येणे आजार आल्यास घाबरून जाऊ नये. हा औषधांशिवाय बरा होता. त्यासाठी दिवसांतून पाच ते सहा वेळा डोळ्यांवर पाणी मारुन स्वच्छ करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त आठवड्याभरात हा आजार बरा होतो. डोळे आल्यावर इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गॉगल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीचा रुमाल, टावेल वापरु नये, डोळ्यांना सारखा हात लावू नये, हे उपाय डॉक्टरांनी सुचवले आहे.

आजाराची लक्षणे कोणती

सुरुवातील डोळे लाल होतात. तसेच डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होते. वारंवार डोळ्यांवर खाज येऊ लागते. डोळ्यात थोडा चिकटपणा असतो.


Share News

copylock

Post Top Ad

-->