दि.०४.०८.२०२३
डोळ्यांची आवश्यक काळजी घ्या; अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन..
DharmaraoBaba Atram
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते.
तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत.
DharmaraoBaba Atram वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्व सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क सूचना केली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डोळे येण्याची साथ पसरू नये यासाठी ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत, तेथे पालिकेच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करून आवश्यक माहिती संबंधित विभागाला दिली पाहिजे. सर्व आरोग्य संस्थामध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध केली जात आहेत. जिल्ह्यातील व तालुक्यातील शाळेतील प्राध्यापक व शिक्षकांना अशा प्रकारे होणार्या आजाराबाबत सखोल माहिती व ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे, अशा सूचनाही मंत्री आत्राम यांनी केल्या आहेत.
लक्षणे आढळल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नयेपावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे ठाळावे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना लक्षणे आढळून आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. डोळ्यांचा संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा, असे आवाहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.